‘कृतांत’मध्ये संदीप कुलकर्णी वेगळय़ाच रूपात

सामना ऑनलाईन । प्रतिनिधी

‘कृतांत’ या आगामी चित्रपटात अभिनेता संदीप कुलकर्णी पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. ‘रेनरोज फिल्म्स’च्या बॅनरखाली मिहीर शाह यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच जारी करण्यात आला. दिग्दर्शक दत्ता भंडारे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केले आहे.

‘कृतांत’चे कथानक आजच्या लाइफस्टाइलवर आधारित आहे. भंडारे यांनी या चित्रपटात वर्तमान काळातील दैनंदिन जीवनाची सांगड जगण्याच्या तत्त्वज्ञानाशी घालत एक अनोखी कथा सादर केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या धावपळीच्या व्यावहारिक जीवनातील तात्त्विकतेचा संबंध अधोरेखित करण्यात आला आहे. संदीपच्या जोडीला या चित्रपटात सुयोग गोऱहे, विद्या करंजीकर, सायली पाटील आणि वैष्णवी पटवर्धन यांच्या भूमिका आहेत. विजय मिश्रा या चित्रपटाचे डीओपी आहेत. संगीतकार विजय नारायण गावंडे यांनी या चित्रपटातील गीतांना संगीत दिले आहे. दत्ताराम लोंढे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.