सानियाची रँकिंगमध्ये घसरण

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. २०१४ सालानंतर पहिल्यांदाच अव्वल दहा जणांच्या यादीतून तिला बाहेर जावे लागले आहे. मात्र गेल्या तीन स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारा दिवीज शरण याने अव्वल ५० जणांच्या यादीत प्रवेश केलाय. रोहन बोपण्णा १५व्या स्थानावर आहे.