सर्जिकल स्ट्राइक नको, लाहोरपर्यंत लष्कर पाकिस्तानात घुसवा; संजय राऊत यांची मागणी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा दहशतवादी हल्ल्याची माहिती देण्यासाठी नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांत या हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जसे कठोर पाऊल उचलले होते, अशीच कारवाई मोदी सरकराने करावी अशी मागणीही त्यांनी केली. आता फक्त सर्जिकल स्ट्राईक करून काहीही साध्य होणार नाही. आता लष्काराला थेट लाहोर आणि इस्लामबादपर्यंत घुसवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. या बैठकीत दहशतवादाविरोधात सर्व पक्ष सरकारच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे सांगण्यात आले.

शहीदांच्या कटुंबीयांच्या दुःखात सर्व पक्ष सहभागी आहेत. मोदी सरकारने दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्जिकल स्ट्राईक करण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र, आता सर्जिकल स्ट्राईकने काहीही साध्य होणार नाही. आता थेट लाहोर, इस्लामाबादपर्यंत लष्कर घुसवण्याची गरज आहे. इंदिरा गांधी यांनी जशी कठोर करवाई केली होती, तशीच कारवाई आता करण्याची वेळ आली आहे, असे राऊत यांनी सांगितले. सीआरपीएफच्या जवानांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणीही त्यांनी केली. दहशतवादाविरोधातील लढाईत संपूर्ण देश आणि सर्व पक्ष सरकार आणि लष्कराच्या पाठिशी असल्याचे सर्व पक्षांनी सांगितले.

एक प्रतिक्रिया

 1. आधी एक काम करा
  तुमच्या मुलाला किंवा मुलीला पाहिले भारतीय सेनेत पाठवा, लगेच
  तुम्ही असे केले की, मग बाकीच्यांना पण छातीठोक पाने तुम्ही सांगू शकाल, बघा मी पाठवले माझ्या मुलांना सैन्यात
  आणि मग बोला की पाकिस्तान वर आक्रमण करा, बॉम्ब टाका

  तुमची मुले safe, तिकडे परदेशात अन तुम्ही सांगता युद्ध करा दुसऱ्यांच्या मुलांच्या जिवावर?
  तुम्ही मस्त ac room मध्ये बसून मोठ्या गप्पा मारणार न बाकीच्यांना सांगणार की तुमची मुले युद्धात पाठवा …. का म्हणून?

  तुम्ही मुंबईतून येणारे ‘आदेश पळत जा’ बाकी ac वाढवा आणि आपला बँक बॅलन्स, प्रॉपर्टी कशी वाढेल एवढेच बघा
  युद्ध, आक्रमण हे तुम्हाला नाही समजणार न शोभणारी पण

  तुम्ही स्वतः किती रुपये देणगी म्हणून देशाच्या वीर जवानांना दिल्याचे ऐकिवात नाही …..