लोकसभा टीव्हीवर रोखठोक बोलणार खासदार संजय राऊत

50

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा टीव्ही या सरकारी टीव्ही चॅनेलच्या ‘कॉन्फरन्स रुम’ या कार्यक्रमात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची पत्रकार रोखठोक मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खासदार संजय राऊत शिवसेनेची विविध राष्ट्रीय, प्रादेशिक विषयांशी संबंधित राजकीय भूमिका मांडणार आहेत.

देशापुढील आव्हाने, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका, महाराष्ट्रातील निवडणुका, राम मंदिर, खासदार गायकवाड यांना झालेली विमानबंदी या आणि इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर ते थेट बोलणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण लोकसभा टीव्ही वर शनिवारी रात्री ८ वाजता केले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या