मीरेचा मुक्त भाव हवाहवासा – संजिवनी भिलांडे

देवाचे वेगळे परिमाण सांगताहेत गायिका संजिवनी भिलांडे.

> देव म्हणजे? –देव म्हणजे विश्वास

> आवडते दैवत? – संत मिराबाई यांना मी दैवत मानते. तिचा मुक्त भाव हवाहवासा वाटता. तिची ओळख आत्म्याची ओळख आहे, शरीराची नाही. त्यामुळे मला प्रेरणा मिळते. प्रत्येक स्त्रीने हे ओळखलं की आपली ओळख ही कला, बुद्धिमत्ता, हुशारी आहे.

> धार्मिक स्थळ? – वैष्णोदेवी मला आवडतं. माउंट अबू येथील दिलवारा जैन मंदिर.

> आवडती प्रार्थना – नमोकार मंत्र

> आवडते देवाचं गाणं? – या या गणराया… हे मी गायलेलं गाणं.

> धार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का? – संत तुकारामांची मी फॅन आहे. त्यांच्या ग्रंथाचा सध्या इंग्रजी अनुवाद करत आहे. अभ्यासही करत आहे.

> दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का? – माझा दैवी चमत्कारापेक्षा दैवी आत्मनिवेदन आणि अनुसंधान करण्यावर जास्त विश्वास आहे. माझ्या देवाशी माझा वैयक्तिक संवाद सुरू असतो. देव माझ्या छोटय़ा छोटय़ा ईच्छा पूर्ण करतो, असे मला वाटते.

> आवडता रंग? – जांभळा

> अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं? – नृत्य केल्यावर मला समाधान मिळतं.

> दुःखी असतेस तेव्हा? – स्पष्टपणे समोरच्याला त्यांची चूक सांगते. आपल्याला देवाने खूप दिलंय जास्त हाव करू नये. आपलं काम अजून चांगलं करावं. मग सगळं आपसूकच मिळतं. भांडून काही मिळत नाही. हे स्वतःच्या मनाला समजावते. सध्या देवावर विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

> देवभक्त असावं पण देवभोळं नसावं… तुझं मत काय? – देवभोळं असण्यापेक्षा स्वतःविषयी आत्मविश्वास असावा. खुद मे जो है वो खुदा है ! त्याची भक्ती करावी, कर्मयोगी असावं. स्वतःच्या कामात झोकून देऊन काम करावं, यातचं देव मानावा असं मला वाटतं. आपल्याकडे अध्यात्म हे कोणत्याही धर्माशी बांधलेलं नाही

> मूर्तीपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना? – दोन्हीही मी करत नाही, पण जेव्हा मी गाते किंवा नृत्य करण्यासाठी उभी राहते तेव्हा मी प्रत्यक्ष तिथे नसतेच, असं मला वाटतं. त्यावेळी एक वेगळ्याच प्रकारची स्पंदन मला मिळत असतात, हीच माझी प्रार्थना आहे.