राममंदिरासाठी 6 डिसेंबरला आत्मदहन! संत परमसंह दास यांचा इशारा

2
sant-paramhans-das

मनोज श्रीवास्तव । लखनौ

‘सरकारने 6 डिसेंबरपर्यंत अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिर निर्माणाची तारीख जाहीर केली नाही तर अयोध्येत चिता रचून आत्मदहन करेन’, असा इशारा तपस्वी छावणीचे संत परमहंस दास यांनी दिला आहे. त्यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला धडकी भरली आहे.

संत परमहंस दास भदोहीच्या सीतामढी येथील माती कलशात घेऊन ही घोषणा केली आहे. सीतामढी येथेच माता सीतेने प्राण त्याग केल्याची पौराणिक मान्यता आहे. त्याच ठिकाणची माती मस्तकावर धारणकरून 6 डिसेंबर रोजी चितेवर बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या संदर्भात अयोध्येचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जोगेंद्र कुमार यांनी ‘दोपहर का सामना‘च्या प्रतिनिधींना माहिती दिली. ‘अयोध्येसंदर्भातील प्रत्येक्ष घडामोडी माहिती आमच्याकडे आहे. गुप्तचर विभाग यावर नजर ठेवून आहे. प्रशासन योग्यवेळी योग्य कारवाई करेल. कोणालाही आत्मदहन करू दिले जाणार नाही’.

दरम्यान, परहंस दास यांनी याआधी देखील राममंदिर निर्मणासाठी आरमरण उपोषण केले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या नावाची खूप चर्चा झाली होती.