माऊलींचा पालखी सोहळा सोलापूरमध्ये

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम ॥ हेचि मज प्रेम देयी देवा ॥
डोळे भरूनिया पाहिन तुझे मुख ॥ हेचि मज सुख देयी देवा ॥
अशी आस मनी बाळगून पंढरीस निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवरील धर्मपुरी येथे आगमन झाले. माऊलींसह लाखो वैष्णवांचे जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.विरेशप्रभु यांनी अत्यंत उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले. उद्या दि.२९ रोजी पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पुरंदावडे येथे होणार आहे. त्यानंतर हा सोहळा माळशिरस मुक्कामी पोहचेल.

श्री ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण गुरूवारी सदाशिवनगर येथील पुरंदावडे हद्दीतील नवीन जागेत होणार असून या रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. रिंगण सोहळ्यानंतर हा सोहळा माळशिरस मुक्कामी पोहोचेल.