मॅड कॉमेडी येतेय ‘सही है यार’

सामना ऑनलाईन । मुंबई

संतोष पवारचे ’सही है यार’ हे नवे नाटक आले आहे. या मॅड कॉमेडीत त्याच्या साथीला किशोर चौघुले, किशोरी आंबिये, आनंदा वारेकर, हर्षदा बामणे व यशोधन मावळंकर यांच्या भूमिका आहेत. श्रीरंग स्वामी समर्थ या संस्थेतर्फे निर्मात्या लीना गद्रे यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले आहे. जयवंत फाटक यांनी लेखन केलेले असून नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून दत्ता थिटे यांनी या नाटकाला संगीत दिले आहे.