संतोष पवार घेऊन आलाय… ‘यदाकदाचित रिटर्न्स’

14

सामना ऑनलाईन । मुंबई

विनोदी नाटके म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून ओळख असलेल्या संतोष पवारचा हातखंडा प्रकार! याच संतोष पवारने त्याचे ‘यदाकदाचित’ हे नाटक रंगभूमीवर आणले होते त्याला 20 वर्षे होऊन गेली आहेत. या नाटकाचे त्यावेळी तब्बल चार हजार प्रयोग झाले होते. धमाल कॉमेडी अशा या नाटकाने अमाप लोकप्रियता कमावली होती.

आता संतोष पवार ‘यदाकदाचित रिटर्न्स’ हे नवीन नाटक घेऊन येत आहे. अनेक यशस्वी नाटके देणारी ‘श्री दत्त्तविजय प्रोडक्शन’ ही नाट्यसंस्था ‘यदाकदाचित रिटर्न्स’ हे नाटक रंगभूमीवर आणत आहे. तरुण पिढीचे तब्बल 16 कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व गीते अशी जबाबदारी संतोष पवारने सांभाळली आहे. अजय पुजारी (नेपथ्य), चेतन पडवळ (प्रकाशयोजना), प्रणय दरेकर (संगीत) अशी या नाटकाची उर्वरित टीम आहे. या नाटकाची तालीम सध्या धडाक्यात रंगली आहे. 18 मे रोजी ‘यदाकदाचित रिटर्न्स’ या नाटकाचा शुभारंभ होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या