सपना चौधरीने बहिणीसह पक्षप्रवेश केला, काँग्रेस उत्तर प्रदेशच्या सचिवांचा दावा

1

सामना ऑनलाईन । लखनौ 

सुप्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना सपना चौधरी हिने शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच नसल्याचे सपनाने रविवारी स्पष्ट केले. परंतु सपना चौधरीने आपल्या बहिणीसह काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे सचिव नरेंद्र राठी यांनी म्हटले आहे.

सपना चौधरी वि तिच्या बहीणीने काँग्रेस पक्षाच्या सदस्यपदाचा फॉर्म भरला होता. त्याचा हवाला देऊन राठींनी सपना चौधरीचा काँग्रेस प्रवेशाचे वृत्त खरे असल्याचे म्हटले आहे. तसेच सपना पक्षा कार्यालयात आली, तिने फॉर्म भरून सही केली. तसेच तिच्या बहिणीनेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोघींच्या सदस्यत्वाचा फॉर्म आपल्याकडे असल्याचे राठींनी म्हटले आहे.