गायिका व नृत्यांगना सपना चौधरीबाबत या गोष्टी माहितीय का?

5

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हरयाणाची गायिका आणि नृत्यांगना सपना चौधरी हिने शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लाखो चाहत्यांसमोर स्टेजवर आपला जलवा दाखवणारी सपना चौधरी राजकीय मैदानात किती तग धरते हे येत्या काळात कळेलच. सपनाला मथुरातून भाजपच्या तिकीटावर लढणाऱ्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविरोधात मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. परंतु एवढी लोकप्रिय झालेली सपना चौधरी नक्की आहे तरी कोण हे जाणून घ्या…

  • सपना चौधरी हिचा जन्म 25 डिसेंबर 1990 ला हरयाणातील रोहतक येथील एका साधारण कुटुंबामध्ये झाला होता. सुरुवातीला तिला सुष्मिता या नावाने कुटुंबीय हाक मारायचे परंतु शाळेमध्ये दाखल करताना तिचे नाव बदलून सपना ठेवण्यात आले.

sapna3

  • सपानाचे वडील एका खासगी कंपनीमध्ये कामला होते. सपना 12 वर्षाची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर तिने आपल्या एकटीच्या जीवावर संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण केले.

sapna4

  • वडिलांच्या निधनानंतर सपनावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. सुरुवातीला टीव्ही शोमध्ये आणि त्यानंतर स्टेज परफॉरमन्सने चाहत्यांचे मन जिंकले. गायिकी आणि नृत्य या जोरावर तिने प्रसिद्धी मिळवली. ‘बिग बॉस 11’ मध्येही सपना दिसली होती.

sapna2

  • ‘सॉलिड बॉडी’ या एका गाण्याच्या बळावर तिने प्रसिद्धीचे शिखर गाठले. हरयाणासह उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि पंजाबमध्ये तिच्यावर जीव ओवाळून टाकणारे चाहते तिला मिळाले.

sapna

  • सपना चौधरी हिने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. तसेच अनेक वादांमध्ये तिचे नाव समोर आले होते. गुडगावमध्ये एका कार्यक्रमात जातिवाचक शब्दांचा गाण्यामध्ये प्रयोग करून दलितांचा अपमान केल्याचा आरोप केल्यानंतर तिच्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. तसेच तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती.

sapna5