मुलीच्या पहिल्या सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी ना अमृता ना सैफ-करिना

amruta-saif-kareena

सामना ऑनलाईन । मुंबई

‘केदारनाथ’ या सिनेमातून सारा अली खान फिल्मी जगतात एन्ट्री करत आहे. तिच्या डेब्यू फिल्मचे स्क्रीनिंग काल मुंबईत करण्यात आले. बॉलिवडूमधील बड्या हस्तींनी या स्क्रीनिंगला हजेरी लावली असली तरी मीडिया ज्यांची वाट पाहात होती अशा अमृता, सैफ, करिना पैकी कुणीही इथे हजर नव्हते. मुलीच्या पहिल्या फिल्मला अमृता हजर नसल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान या जोडीचा केदारनाथ 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिषेक कपूरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या स्क्रीनिंग वेळी सारा सफेद रंगाच्या पंजाबी सूटमध्ये दिसली. ती येणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीचे स्वागत करत होती. या स्क्रीनिंगला अभिनेत्री जान्हवी कपूर, आहाना पांडे, दिग्दर्शक शशांक खेतान उपस्थिती होते. दिग्दर्शक अभिषेक कपूर आपल्या पत्नीसोबत आले होते. सुनील शेट्टी, किरण राव, राज कुंद्रा, सोहेल खान, ईशान खट्टर यांनी देखील हजेरी लावा.