गुणीदास संगीत संमेलन

1

र्वाधिक प्रतिष्ठानच्या संगीत महोत्सवांपैकी एक असे ‘गुणीदास संगीत संमेलन’ नेहरू सेंटर, वरळी येथे उद्यापासून सायंकाळी ६ वाजता सुरू होत आहे. यामध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, आघाडीचे गायक उस्ताद राशीद खान, संतुरवादक पंडित सतीश व्यास यांच्याबरोबरच इतरही मान्यवर कलाकार सहभागी होणार आहेत.

गायक जयतीर्थ मेवुंदी, गायिका शास्वती मंडल, सायली तळवलकर, सरोदवादक अमान अली बंगश, सितारवादक शुभेंद्र आणि सेल्लोवादक सास्कीया राव यांचा यात समावेश आहे. तीनदिवसीय असलेले हे संमेलन यंदाचे ४१ वे संमेलन आहे. गेली ४० वर्षे या महोत्सवामध्ये अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनी आपली कला सादर केली आहे.