Video : उदयनराजेंचे समर्थक सुनील काटकरांवर बिचुकले यांचा गंभीर आरोप


सामना प्रतिनिधी । सातारा

साताऱ्यामध्ये अभिजित बिचुकले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विद्यामान खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक सुनिल काटकरवर यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बिचुकले यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

सातारामध्ये प्रसिध्द असलेले व्यक्तिमहत्व म्हणजे उदयनराजे. पण हेच उदयनराजे म्हणतात की मी फक्त अभिजितला घाबरतो. याच अभिजित बिचुकले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरळ सरळ उदयनराजे यांचे कट्टर समर्थक सुनील काटकर यांच्यावर गंभीर आरोप केले. ‘काटकर यांनी माझ्यासमोर पैसे फेकले आणि माझे फोटो काढून व्हायरल करण्याची, बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच तू तुझा प्रचार करायचा नाही, नाहीतर वाईट परिणाम होतील’, अशी धमकी दिल्याचा आरोप बिचुकले यांनी सुनील काटकर व पंकज चव्हाण यांच्यावर केला आहे.

याआधीही बिचकुले हे वेगवेगळ्या शक्कल लढवून प्रसिद्धी मिळवत आले आहेत. यामुळे बिचुकले यांचा हा प्रसिद्धीसाठीचा स्टंन्ट तर नाही ना? अशा उलट सुलट चर्चा साताऱ्यात रंगत आहेत.