सत्यपाल मलीक यांची जम्मू कश्मीरच्या राज्यपालपदी निवड

सामना ऑनलाइन । नवी दिल्ली

देशातील सात राज्यात नव्या राज्यपालांची घोषणा मंगळवारी राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली. जम्मू कश्मीरमध्ये एन. व्ही, व्होरा यांच्याजागी सत्यपाल मलीक यांची निवड करण्यात आली आहे. व्होरा दहा वर्षांपासून जम्मू कश्मीरच्या राज्यपालपदी होते. मलीक याआधी बिहारचे राज्यपाल होते. रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाल्यानंतर मलीक यांना राज्यपालपद देण्यात आले होते. लालजी टंडन यांची बिहारचे राज्यपाल म्हणून निवड करण्यात आली आहे. टंडन यांच्यासह सत्यदेव नारायण, बोबी रानी मोर्य, गंगाप्रसाद, तथागत रॉय, कप्तानसिंह सोलंकी यांनाही राज्यपालपद देण्यात आले आहे.

या राज्यात राज्यपालांची निवड

राज्य                          राज्यपाल
बिहार                   लालजी टंडन
जम्मू-कश्मीर          सत्यपाल मलिक
उत्तराखंड             बेबी रानी मौर्य
सिक्कीम              गंगा प्रसाद
मेघालय              तथागत रॉय
त्रिपुरा                कप्तान सिंह सोलंकी
बिहार               सत्यदेव नारायण आर्य