रमजान संपल्यानंतर ‘त्या’ तिघांना फासावर लटकवणार


सामना ऑनलाईन । रियाध

रमजानचे पवित्र पर्व संपल्यानंतर सौदी अरेबियाच्या सरकारकडून तीन मुस्लीम धर्मगुरुंना फासावर लटकवण्यात येणार आहे. या तिघांवर दहशतवादाचा प्रसार आणि प्रचार केल्याचा आरोप आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, शेख सलमान अल अवदाह, आवाद अल कारनी आणि अली अल कुमारी अशी त्या तिघांची नावे असून त्यांना रमजान संपल्यानंतर फासावर लटकवण्यात येणार आहे. शेख सलमान अल अवदाह हे आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले मुस्लीम धर्मगुरु आहेत. अल कारनी हे मौलवी व लेखक आहेत तर अल कुमारी हे प्रसिद्ध धर्म प्रसारक आहेत. या तिघांवरही सौदी अरेबियात दहशतावदाचा प्रचार केल्याचे आरोप आहेत.

गेल्या महिन्यात सौदी अरेबियामध्ये 37 जणांना फासावर लटकविण्यात आले आहे. या सर्वांवर दहशतवाद पसरविण्याचे आरोप आहेत. सौदी अरेबियात 2018 मध्ये 148 जणांना फासावर लटकविण्यात आले आहे.