बायको पुढे चालते म्हणून दिला तलाक

सामना ऑनलाईन । सौदी अरेबिया

सौदी अरेबियाध्ये एका पतीने त्याच्या पत्नीला फक्त रस्त्यावर अनेकदा त्याच्या पुढे चालत असल्यामुळे तलाक दिल्याचं समोर आलेय. आपल्या बायकोला वारंवार पुढे चालू नको अशी ताकीद देऊनही ती त्याच्या पुढे चालत राहिल्यामुळे त्या महिलेच्या नवऱ्याने तिला तलाक दिल्याची माहिती गल्फमधील एका वर्तमानपत्राने दिली आहे.

सौदी अरेबियामध्ये विचित्र कारणांसाठी तलाक दिल्याच्या आणखीही काही घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एका घटनेमध्ये बायकोने जेवणात बकऱ्याची मुंडी दिली नाही म्हणून तलाक देण्यात आला, तर दुसऱ्या एका घटनेत हनीमूनच्या वेळी बायकोने पायात पैंजण घातले म्हणून तिला तलाक देण्यात आला.