मालवण एस.टी. आगारात ‘इंधन बचत’चा शुभारंभ

सामना ऑनलाईन । मालवण

मालवण एस. टी. आगाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘इंधन बचत’ कार्यक्रमाचा शुभारंभ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे एस. एस. कोलगावकर यांच्या हस्ते सोमवारी (१६) करण्यात आला. हा कार्यक्रम १५ फेब्रुवारी पर्य़ंत राबविला जाणार आहे.

यावेळी एस. एसकोलगावकर म्हणाले, इंधन ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने इंधन बचत केली पाहिजे. केवळ एसटी प्रशासनापूरती इंधन बचतीचे कार्यक्रम न घेता राष्ट्रीय संपत्ती वाचविण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी चालक तसेच कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी डीझेल वापर व बचत करण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार व्यवस्थापक संतोष बोगरे यांनीही इंधन बचतीचे माहिती विषद केली.

यावेळी स्थानक प्रमुख डी. डी. कदम, कार्यशाळा अधीक्षक जे. ए. जाधव, लेखाकार यु. यु. खरात, ए. एस. न्हिवेकर यांच्यासह चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी व प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थित होते.