आणखी एका खासदाराने राजीनामा दिला, भाजपच्या उरात धडकी

सामना ऑनलाईन, लखनऊ

भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. गेले काही महिने त्या सातत्याने मोदी सरकारवर टीकेचे आसूड ओढत होत्या. मोदी सरकार दलित विरोधी असल्याचा त्यांनी सातत्याने आरोप केला आहे. पक्षाचा राजीनामा देताना त्यांनी भाजप सरकार हे समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे.

स्वच्छता मोहीम हा सरकारचा पब्लिसिटी स्टंट, भाजपला घरचा आहेर

सावित्रीबाई फुले या लखनऊतील बहराईच मतदारसंघाच्या खासदार आहेत. सावित्रीबाई फुले यांनी मोदी सरकारचे धोरण हे दलितविरोधी असल्याचा  स्पष्ट आरोप करत मोदी सरकारविरोधात मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी  एप्रिल महिन्यात संविधान बचाव’ रॅली देखील काढली होती.

गेल्या काही महिन्यात भाजपला रामराम ठोकलेल्या खासदारांची नावे पाहा

  • नाना पटोले- महाराष्ट्र
  • थूपस्तान छवांग- लडाख
  • हरीश मीणा- मीणा,राजस्थान
  • सावित्रीबाई फुले- उत्तर प्रदेश