डासांना पळवणारा ‘स्मार्टफोन’ लाँच

सामना ऑनलाईन । मुंबई

स्मार्टफोनने आपल्याला बरेच स्मार्ट बनवले आहे. सर्वच गोष्टींसाठी वापरण्यात येणार स्मार्टफोन आता घरातील डास पळवून लावण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. एलजी कंपनीद्वारे एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून त्यात डास पळवण्यासाठी एक विशेष सॉफ्टवेअरही बसविण्यात आले आहे. अशाप्रकारे घरातून डास पळवून लावणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन असून गेल्यावर्षी दिल्लीतील एका कार्यक्रमात लाँच करण्यात आले होते. फक्त स्मार्टफोनच नाही तर एलजी कंपनीद्वारे एक टीव्हीदेखील लाँच करण्यात आला होता. या टीव्हीमध्ये देखील अशाप्रकारे डासांना पळवून लावण्यासाठी सॉफ्टवेअर बसविण्यात आले होते.

‘एलजी के ७ आय’ असे या स्मार्टफोनचे नाव असून याची किंमत ६,९९० रूपये आहे. या व्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये ५ इंच एचडी डिस्प्ले, १.४ जीएचझेड क्वॉडकोर प्रोसेसर,२ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी असून १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. त्याशिवाय या फोनमध्ये ८ मेगापिक्सल रियर कॅमेरा व ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. ४जी वोल्टइ सपोर्टिव्ह असलेला हा फोनमध्ये वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीएस या सुविधाही देण्यात आल्या आहेत. हा स्मार्टफोन विविध ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे