सायली संजीव खरोखर जाणार परदेशात?

सामना ऑनलाईन । मुंबई

काहे दिया परदेस या मालिकेमुळे सायली संजीव हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. या मालिकेत ती साकारत असलेली गौरी ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी गौरी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. मालिकेत मुंबई ते बनारस असा प्रवास करणारी गौरी उर्फ सायली ही प्रत्यक्ष आयुष्यातही परदेशात रवाना झाली आहे. सायली नुकतीच लंडनला रवाना झाली असून तिनेच ही बातमी इन्स्टाग्रामद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितली आहे.

तिने तिचा विमानतळावरील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून त्याचसोबत लंडन, शूट, अॅक्टर्स लाइफ, सरप्राईज, कमिंग सून असे हॅश टॅग दिले आहेत. काहे दिया परदेस ही मालिका संपल्यानंतर सायली चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा कित्येक दिवसांपासून सुरू होती. आता ती तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला रवाना देखील झाली आहे. या चित्रपटात तिच्या सोबत दिल दोस्ती दुनियादारी फेम सुव्रत जोशी देखील असणार असल्याचे कळतेय. सुव्रतदेखील लंडनला रवाना झाला आहे. सुव्रत आणि सायलीच्या चित्रपटाचे नाव काय आहे, या चित्रपटात त्यांच्या भूमिका काय असणार आहे याबाबत प्रेक्षकांना काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.

London…… #london #shoot #actor #actorslife #surprise #comingsoon

A post shared by Sayali Sanjeev (@sayali_sanjeev_official) on