व्हीव्हीपॅटबद्दल भूमिका स्पष्ट करा!

supreme-court

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

निम्म्या 50 टक्के मतपावत्यांची (व्हीव्हीपॅट) मोजणी लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषित करण्यापूर्वी प्रत्येक मतदारसंघात करावी अशी मागणी करणारी याचिका विरोधकांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. यावर आता आपण आपली भूमिका, बाजू मांडा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगास दिले आहेत. तसेच या याचिकेची पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टाने येत्या 24 मार्च रोजी ठेवली आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) जे मतदान होईल त्यापैकी मतदानाच्या निम्म्या मतपावत्यांची मोजणी करावी अशी मागणी याचिकेद्वारे विरोधकांनी केली आहे.