हिंसा करणार्‍या कावडियांवर कडक कारवाई करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

 

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी दिल्लीसह अनेक शहरात कावडियांनी हिंसा केली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने हिंसा पसरवणार्‍या कावडियांवर कडक कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले आहे. हिंसक जमावाने खाजगी संपत्तीचे नुकसानीविरोधात दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायाल्याने हे आदेश दिले.

कावडियांनी रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली त्यावेळी पोलीस काय करत होते? असा प्रश्न ऍटर्नी जनरल यांनी उपस्थित केला. तसेच “कावडियांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून ठेवला होता. सध्या साक्षर लोक हिंसा करत आहे, कधी मुंबईत मराठा आंदोलनासाठी, तर कधी एससी/एसटी कायद्यासाठी निदर्शने करताना हिंसा केली गेली. एका चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी एका अभिनेत्रीला धमकवण्यात आले,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावर न्यायालयाने ऍटर्नी जनरल यांना उपाय विचारला. त्यावर ऍटर्नी जनरल म्हणाले की “अशावेळी पोलिसांची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.”