सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला फटकारले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सुधारित घटनेबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य ते प्रस्ताव द्या, हटवादीपणा कराल तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील, अशा शब्दांत आज सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने बीसीसीआयला चांगलेच फटकारले.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बीसीसीआयच्या मनमानी वृत्तीवर जोरदार हल्ला केला. क्रिकेट बोर्डाच्या सुधारित घटनेत न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींचा समावेश व्हायलाच पाहिजे. अन्यथा बीसीसीआयवर कठोर कारवाई करू असे न्यायालयाने बजावले.