रक्तवाढीच्या गोळ्या खाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

सामना ऑनलाईन । नगर

रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्याने एका विद्यार्थाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नगरमध्ये घडल्याचे समोर आले. प्रणित गुंजाळ असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील नुतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात प्रणव शिकत होता. दर सोमवारी विद्यालयात किशोरवयीन विद्यार्थ्यांना रक्त वाढीच्या गोळ्या दिल्या जातात. सोमवारीही विद्यार्थ्यांना या गोळ्या देण्यात आल्या. प्रणवने त्या गोळ्या खाल्या आणि त्याचा मृत्य झाल्याचे त्याच्या पालकांनी म्हटले आहे.

दरम्यान, प्रणवने गोळ्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे विद्यालयाने सांगितले आहे.