धक्कादायक! चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंडमध्ये एका 9 वर्षीय मुलीचा स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत असताना चुकीचे आयस्क्रिम खाल्ल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आयस्क्रीमध्ये बदामाचा जास्त अंश असल्याचे मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

हबीबा चिश्ती नावाच्या या मुलीला बदामाची अॅलर्जी आहे. त्यामुळे तिचे आई-वडील खूपच सावधगिरी बाळगत होते. याच दरम्यान सुट्टी घालवण्यासाठी ते मुलगी चिश्ता व मुलाला घेऊन स्पेनमधील कोस्टा डेल सोल नावाच्या ठिकाणी गेले होते. येथे मुलीने आयस्क्रीम खाल्ल्यानंतर ती आजारी पडली.

चिश्ताने एका स्थानिक दुकानातून आयस्क्रिम खरेदी केली होती. आयस्क्रिम दुकानदाराने यात बदाम नसल्याचे सांगितले होते. परंतु आयस्क्रीम खाताच ती आजारी पडली. यानंतर तिला मलागा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातच तिचा मृत्यू झाला.