संतापजनक! शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थीवर बलात्कार, ९ मुलींचा विनयभंग

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । राजनांदगांव

छत्तीसगड राज्यातील राजनांदगांव येथे गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याचे प्रकरण समोर आले आहे. येथील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने आपल्याच वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच इतर नऊ मुलींचा विनयभंगही या नराधमाने केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास तर आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

सरकारी शाळेत सातवीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीने शिक्षकाचे घृणास्पद कृत्य कुटुंबीयांनी सांगितले तेव्हा त्यांनी धक्काच बसला. या शिक्षकाने एक वर्षापूर्वीही असाच प्रकार केला होता. परंतु त्यावेळी शाळेच्या समितीने त्याला इशारा देऊन सोडून दिले होते. शिक्षकानेही अशी चूक पुन्हा होणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु लैंगिक लालसेने पिसाळलेल्या शिक्षकाने पुन्हा एकदा तसेच कृत्य केल्याचे पीडित मुलीने सांगितले. इतरही मुलींनी आपल्या कुटुंबीयांनी शिक्षकाच्या चाळ्यांबाबत माहिती दिली. यानंतर सर्व पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत नराधम शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. श्याम साई काद्यम (५०) असे या शिक्षकाचे नाव आहे. तो गेल्या एक वर्षापासून सहावी आणि सातवीतील मुलींचे शोषण करत होता.

Summery – A school teacher of a government school in Rajnandgaon has allegedly raped a minor girl and molested 9 other girls. Case registered.