प्रभादेवी येथे मुलांनी खचाखच भरलेल्या शाळेच्या व्हॅनला आग

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रभादेवी येथे ग्रीन लॉन्स शाळेच्या व्हॅनला आग लागल्याची घटना घडली आहे. या आग लागल्यामुळे व्हॅनचं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. व्हॅनमधून धूर आल्यानंतर लगेचच चालकाने व्हॅनमधील मुलांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र, या मुलांची दप्तरं आणि त्यातील वह्या-पुस्तकं या आगीत जळून खाक झाली आहेत.