धक्कादायक! या शाळांमध्ये जात कळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाताला बांधले जातात टॅटू

7


सामना ऑनलाईन। चैन्नई

हाताला रंगीबेरंगी टॅटू आणि बँड बांधणे ही फॅशन समजली जाते. पण तमिळनाडूतील कूड्डालूर जिल्हयातील अनेक शाळांमध्ये जात ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाताला टॅटू व बँड बांधले जात असल्याचं समोर आलं आहे.

येथे ‘वानियार्स‘ हा मागासवर्गिय बहुल समाज आहे. तर अनुसूचित जाति दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे प्रमाण येथील एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के आहे. या दोन्ही समाजात वाद आहे. त्यांच्यातील हे शत्रुत्व शाळांपर्यंत पोहचलं आहे. यामुळे शाळेत येणारी मुलं कोणत्या जातीची आहेत हे कळण्यासाठी त्यांच्या हातावर जीतीनुसार रंगीत बॅंड व टॅटू काढण्यात आले आहेत. मुलांच्या हातातील लाल व निळ्या रंगाचा बँड ते खालच्या जातीचे असल्याचे दर्शवतो. तर पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे टॅटू ते वानियार्स किंवा एखाद्या राजकीय पार्टीशी संबंधित असल्याचे दर्शवतात. त्यानुसार त्यांना सोयी सुविधा पुरविल्या जात असल्याचं शाळेतील शिक्षकांनी सांगितलं आहे. या विद्यार्थ्यांमध्ये शर्ट इन करण्यापासून मुलांचं मुलींबरोबर बोलणं, इस्त्रीचे कपडे घालणे यावरून वाद होत असतात.

यामुळे जिल्हा प्रशासनाने या शाळांसाठी १७ मुद्दे असलेली आचारसंहीता लागू केली आहे. ज्यात या बँड व टॅटूंना बंदी घालण्यात आली आहे. पण तरीही काही शाळा वगळता येथील बऱ्याच शाळांमध्ये ही प्रथा आजही कायम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या