‘हे’ दागिने घाला आणि गर्भधारणा टाळा!

109

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

यापुढे गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांना गर्भनिरोधक गोळ्या घेण्याची गरज नाहीये. कारण कुटुंबनियोजनाचं काम आता तुमचे कानातले, नाकातले व गळ्यातलं लॉकेट व घड्याळ करणार आहे. ऐकायला हे जरी गमतीशीर वाटत असलं तरी संशोधकांनी ते सत्यात उतरवलंय. यामुळे गर्भनिरोधक गोळ्यांच्या कटकटीतून महिलांची सुटका होणार आहे. कंट्रेल्ड रिलीज या जर्नलमध्ये या दागिन्यांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गर्भधारणा टाळण्यासाठी महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात. पण या गोळ्यांचे साई़ड इफेक्ट असल्याने भविष्यात महिलांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. यामुळे संशोधकांनी त्याला पर्याय शोधून काढला आहे. ज्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या न खाताही कुटुंबनियोजन करणं सोप होणार आहे. संशोधकांनी गर्भनिरोधक ज्वेलरी म्हणजे गर्भधारणा रोखू शकतील असे दागिने बनवल्याचा दावा केला आहे. या दागिन्यांमध्ये गर्भनिरोधक हार्मोन्सचे पॅच (ट्रांसडर्मल पॅच) लावले जाणार आहेत. कानातले, नाकातलं, आणि गळ्यातल्या माळा किंवा लॉकेट्समध्ये हे पॅच लावले जाणार आहेत. जेणेकरून तुमच्या त्नचेत हे हार्मोन्स शोषले जातील आणि गर्भधारणा रोखण्याचं काम करतील.

दरम्यान, या पॅचचा उपयोग दुसऱ्या आजारांवरही करता येईल. महिलांना दागिन्यांची आवड असल्याने त्यांच्यासाठी हे दागिेने वापरने सोपे असेल. याआधी धूम्रपानाचे व्यसन घालवण्यासाठी, मेनॉपॉजचा कालावधी वाढवण्यासाठीही या हार्मोन्स पॅचचा वापर करण्यात आल्याचे अमेरिकेतील जॉर्जिया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे मार्क प्रुस्निट्जव यांनी सांगितले आहे.

या पॅचचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला होता. त्यात यश मिळाल्यानेच हा प्रयोग आता मानवावर करण्याचा निर्णय संशोधकांनी घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या