पहिल्या सी वॉटर पार्कचा शुभारंभ

सामना ऑनलाईन । मालवण

मालवण दांडी बीच समुद्रात साकारलेल्या महाराष्ट्र किनारपट्टीवरील पहिल्या’दांडी बीच सी वॉटर पार्क’चे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. दरम्यान आपल्याला केवळ विदेशात पाहावयास मिळणारे सी वॉटर पार्क मालवणच्या किनारपट्टीवर स्वतःच्या हिंमतीवर साकारणाया स्थानिक तरुणांचे धाडस कौतुकास्पद आहे. दांडी सी वॉटर पार्क जिह्याच्या पर्यटनाचे नवीन आकर्षण ठरेल. असा विश्वास व्यापारी संघटना अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी व्यक्त केला.

यावेळी सी वॉटर पार्कचे प्रणेते जलपर्यटन व्यावसायिक, दामू तोडणकर, रुपेश प्रभू यासहदीपक पाटकर, नगरसेविका पूजा करलकर, सुनीता जाधव, ममता वराडकर, आकांशा शिरपुटे, किल्ला होडी वाहतूक व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत, मच्छिमार व्यापारी संघाचे अध्यक्ष विरेश लोणे, उद्योजक परशुराम पाटकर, आदी व इतर जलपर्यटन व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते. शुभरंभानंतर पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी हे पार्क खुले करण्यात आले आहे.