अमेरिकेचा ‘उसेन बोल्ट’, वाऱ्याच्या वेगाने पळत जिंकली 4 सुवर्णपदकं

103

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अमेरिकेत अकरावीमध्ये शिकणारा सेबेस्टियन स्पेंसर या विद्यार्थ्याचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. चार बाय चारशे रिले स्पर्धेतील हा व्हिडीओ लोकांचा अचंबीत करत आहे. कारण आहे वाऱ्याच्या वेगाने धावणारा स्पेंसर. या व्हिडीओत शेवटच्या 100 मिटरदरम्यान स्पेंसर सातव्या स्थानावरून वाऱ्याच्या वेगाने पळत येत पहिला क्रमांक पटकावतो आणि शर्यत जिंकतो. तसेच एकाच दिवसामध्ये चार शर्यतींमध्ये भाग घेतो आणि सर्व स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई करतो. सेबेस्टियन स्पेंसर याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला अमेरिकेचा ‘उसेन बोल्ट’ असे म्हटले जात आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, व्हर्जिनियी राज्याचा चॅम्पियन सेबेस्टियन स्पेंसर याने अॅथलिटमध्ये आपल्या भावाचा विक्रम मोडून कारकीर्दीची सुरुवा केली. त्याने अवघ्या 10.6 सेकंदात 100 मिटरची शर्यत पूर्ण केली. यानंतर त्याने 4 बाय 200 मिटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. ही पूर्ण शर्यत पूर्ण करण्यासाठी गेज रेटर, सिनियर क्विंसी डेमेरॉन, जेक मेक्कॉय आणि सेबेस्टियन स्पेंसर यांनी 1.30.43 सेकंदाचा वेळ घेतला. त्यानंतर चार बाय चारशे मिटर स्पर्धेतही ते सुवर्णपदक जिंकतात. दिवसातील चौथी शर्यत 200 मिटरची होती आणि हे अंतर स्पेंसर 21.61 सेकंदात पूर्ण करतो.

पाहा व्हिडीओ –

आपली प्रतिक्रिया द्या