उंदराचा राडा, मल्टीस्टेट बँकेचा सायरन वाजल्याने गोंधळ

11

सामना ऑनलाईन । पाटोदा

पाटोदा शहरातील बस स्टँडसमोरील महेश मल्टीस्टेट बँकेचा दुपारी अचानक सुरक्षा आलार्म वाजल्याने एकच गोंधळ उडला. बँक, मल्टीस्टेट यांचे सुरक्षेसाठी प्रत्येक शाखेत आलार्ट आलार्म यंत्र बसवलेले असते तेच अचानक वाजले आणि बँकेकडे नागरिकांनी धाव घेतली.

रविवारी सुट्टी असल्याने मल्टीस्टेट बँक बंद होती. त्यात दोन दिवसापूर्वी चोरांनी रात्री धुमाकुळ घातला होता. आता दुपारीच मल्टीस्टेटच्या तिजोरीचा आलार्म वाजल्याने नागरिकांनी चोरी झाल्याचे समजून एकच गोधंळ सुरु केला आणि मल्टीस्टेट कडे धाव घेत गर्दी केली. परंतु प्रत्यक्षात आवाज हा चोरांमुळे नव्हे तर उंदराने स्पर्श केल्याने झाल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या