नौदलातील सुरक्षारक्षकाची ऑनडय़ुटी आत्महत्या


सामना ऑनलाईन,मुंबई

नौदलातील सुरक्षारक्षकाने ऑनडय़ुटी असताना स्वतःकडील एसएलआरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज ट्रॉम्बे येथे घडली. केशर सिंग (56) असे त्या रक्षकाचे नाव होते. आत्महत्येमागचे कारण मात्र समजू शकले नाही. ट्रॉम्बे पोलीस अधिक तपास करीत आहेत. मूळचे पंजाबचे असलेले केशर सिंग नौदलाच्या मुंबईस्थित ट्रॉम्बे येथील नौदलाच्या शस्त्रसाठा डेपोत तैनात होते. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाले. मात्र 11.30 च्या सुमारास केशर सिंग यांनी त्यांच्याकडील एसएलआरमधून स्वतःवर गोळी झाडून घेतली. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून ट्रॉम्बे पोलीस अधिक तपास करीत आहेत.