पार पुर्रररर आणि ठार ठुस्ससस करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला कामावरून काढून टाकले

सामना ऑनलाईन,  फ्लोरिडा

अमेरिकेतील माणसं काय करतील याचा नेम नाही. डग नावाच्या एका सुरक्षा रक्षकाने सलग सहा महिने विशिष्ट वेळी व्हिडीओ चित्रीत केले आणि त्याचा कोलाज बनवून अपलोड केले. या व्हिडीओमुळेच डगला त्याची नोकरी गमवावी लागली आहे.

विचित्र मनोवृत्तीचा असलेल्या डगने कार्यालयात असताना पादत असतानाचा व्हिडीओ चित्रीत केला आहे. डगची इन्स्टाग्राम, युट्यूबवर अकाऊंट असून आपल्या या व्हिडीओला तुफान प्रतिसाद मिळाल्याचा दावा डगने केला आहे. डगचे इन्स्टाग्रामवर पॉल फ्लार्ट नावाने अकाऊंट असून यावर २८ हजार फॉलोअर्स आहेत. त्याच्या फॉलोअर्सना जरी डगचे हे वेडेचाळे आवडत असले तरी तो ज्या ठकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता, त्या हॉस्पिटल प्रशासनाला हा प्रकार आवडला नाही. त्यांनी ताबडतोब डगला कामावरून काढून टाकले आहे.