कोण होणार हिंदुस्थानी महिला संघाचा प्रशिक्षक?

सामना प्रतिनिधी, मुंबई

तुषार अरोठे हे प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यानंतर हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या प्रभारी प्रशिक्षकपदी रमेश पोवार याची निवड करण्यात आली आहे. पण आता या संघाला कायमस्वरूपी प्रशिक्षक मिळावा यासाठी बीसीसीआयकडून उद्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. यामध्ये सुनील जोशी, रमेश पोवार, अजय रात्रा या माजी क्रिकेटपटूंसह एकूण २१ व्यक्तींचा या यादीत समावेश आहे.

तुषार अरोठे व हिंदुस्थानी महिला संघातील खेळाडू यांच्यामध्ये मतभेद झाल्यानंतर रमेश पोवार यांच्याकडे प्रभारी प्रशिक्षकपद सोपवण्यात आले. आता सीओए सदस्य डायना एडुलजी, बीसीसीआयचे साबा करीम आणि अमिताभ चौधरी यांच्याकडून मुलाखती घेण्यात येणार आहेत. सुनील जोशी व रमेश पोवार या दोन व्यक्ती हिंदुस्थानी महिला प्रशिक्षक पदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जात आहेत.

इच्छुक उमेदवारांची यादी
सुनील जोशी, रमेश पोवार, अजय रात्रा, ममता माबेन, सुमन शर्मा, पौर्णिमा राव, मारिया फाहे (न्यूझीलंड).