महिलांच्या सुरक्षेसाठी…

सामना ऑनलाईन । मुंबई

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्त्रियांना उच्चशिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त घराबाहेर पडावे लागते. रात्री अपरात्री प्रवासही करावा लागतो. अशावेळी महिलांनी स्वसंरक्षणासाठी कायम या काही वस्तू आपल्या सोबत ठेवाव्यात.

पेपर स्प्रे
परफ्युम स्प्रेसारखा दिसणारा हा पेपर स्प्रे आकाराने लहान असतो. या स्प्रेचा फवारा थेट समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात केल्यास थोडा वेळ त्याला समोरचे काहीच दिसत नाही.

self-defence-1

सेफ्टी रॉड
छत्रीच्या दांड्याइतका असणारा हा रॉड फोल्डही करता येतो. त्यामुळे तुम्ही तो सहज कॅरी करू शकता.

self-defence-2

फ्लॅशलाईट
एका बाजूने लिपस्टिक व दुसऱ्या बाजूने फ्लॅशलाईट असे फ्लॅशलाईट बाजारात उपलब्ध आहे. या फ्लॅशलाईटचा प्रकाश अतिशय तीव्र असल्याने तो समोरील व्यक्तीच्या डोळ्यावर धरुन त्याच्या हातावर सहजपणे वार करू शकता.

self-defence-3

पेन
पेन हा सहज कॅरी करता येत असल्याने तो समोरील व्यक्तीच्या हातापायांवर वार करण्याच्या कामी येतो.

self-defence-4

हेअरब्रश
स्वसंरक्षणासाठी बनवण्यात आलेला हा खास ब्रश असून त्याचा दांडा अणुकुचीदार असल्याने त्याचा धारदार शस्त्र म्हणून नक्कीच वापर करू शकतो.

self-defence-5

चाकू
धारदार असलेला हा चाकू फोल्डेबल असल्यामुळे तो सहज बॅगेत राहतो.

self-defence-6

किचेन्स
मांजरीच्या आकारात मिळणारे पुढील बाजूस धारदार असल्याने हे तुम्ही संरक्षणासाठी वापरू शकता.

self-defence-7