पाटीलबुवाचा जामीन फेटाळला, तुुरुंगातील मुक्काम वाढला

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

झरेवाडी येथील भोंदू पाटील बुवांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला. जादुटोणा कायद्यांतर्गत पाटील बुवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दलात वाहनचालक असलेला श्रीकृष्ण पाटील हा निवृत्त झाल्यानंतर पाटील बुवा बनला.या पाटील बुवाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामध्ये हा पाटील बुवा शिविगाळ करताना नाचताना दिसून आला.या व्हिडिओ मुळे पाटील बुवांचे प्रताप पुढे आले.एका महिलेने पाटील बुवा विरोधात शिविगाळ आणि दमदाटी चा गुन्हा दाखल केला.या तक्रारी नंतर पळून जाणाऱ्या पाटील बुवाला पोलिसांनी पकडले.या प्रकरणात पाटील बुवाला जामीन झाला तरी त्याच्यवर जादू टोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. ११दिवस पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला, तो अर्ज शुक्रवारी फेटाळण्यात आला.