ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशींचं निधन

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुभांगी या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या काही दिवसांपूर्वी त्यांना पॅरेलिसीसचा अॅटॅक देखील आला होता. तेव्हापासून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

सध्या त्या ‘कुंकु टिकली टॅटू’ या मालिकेत काम करत होत्या. त्यातील त्यांची जीजीची भूमिका तसेच ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील आजीची भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.