ज्येष्ठ नागरिक आज करणार सरकारचा निषेध

12


सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यातील ज्येष्ठ नागरिक आज छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस या ठिकाणी एकत्र जमून मोदी सरकारचा जाहीर निषेध करणार आहेत. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपल्या मागण्यांबाबतचे निवेदन देणार आहे.

एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये आणि शिवशाहीमध्ये 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ स्त्री-पुरुषांना 50 टक्के सवलत मिळावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक कृती समिती मंत्रालयात स्थापन करावी, त्यात ज्येष्ठांचे प्रत्येक महसूल विभागातील 1 प्रतिनिधी घेण्यात यावेत, श्रावणबाळ निवृत्तीवेतन आणि इतर सर्व अनुदान योजनांमध्ये दरमहा तीन हजार रुपयांपर्यंत वाढ करावी, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपयांची अट काढावी आणि निवृत्तीवेतनात वाढ करावी अशा ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्या आहेत अशी माहिती महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष शरद डिचोलकर आणि उपाध्यक्ष विजय गुणाचार्य यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या