पुरे झाले आता सीनिअर खेळाडूंचे लाड, नवोदित क्रिकेटपटूंना संधी द्या!

हिंदुस्थानी क्रिकेट संघातील  अनेक नवोदित खेळाडूंना आतापासूनच पुढील विश्वचषकासाठी  तयार करायला सुरुवात करायला हवी. त्यासाठी संघातल्या सीनिअर खेळाडूंना आराम देऊन नवोदित खेळाडूंना अधिकाधिक संधी द्यायला हवी. आता सीनिअर खेळाडूंचे लाड पुरे झाले, असा सल्ला टीम इंडियाचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने टीम इंडिया आणि हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिला आहे.

युवा खेळाडू क्रिकेटचे भविष्य

इशान किशन, सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू कदाचित पुढच्या विश्वचषकात असतील. या खेळाडूंना तयार करून त्यांना संधी द्यायला हवी. कारण तेच हिंदुस्थानी क्रिकेटचं भविष्य आहेत. त्यामुळे उरलेल्या अनुभवी खेळाडूंना ब्रेक देता येईल, असे सेहवाग म्हणाला.