महिनाभरात चौथा उच्चांक, शेअर बाजार @38,300

1

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई शेअर बाजारात एका महिन्यात चौथ्यांदा विक्रम झाला. सोमवारी शेअर बाजाराचा निर्देशांक 263 अंकांच्या वाढीसह 31,300 वर जाऊन पोहोचला. तर शेअर बाजाराच्या निफ्टीतही 46.50 अंकांची वाढ होऊन तो 1,551 अंकांवर पोहोचला. हिंदुस्थानातील गुंतवणूकदारांनी केलेल्या मोठय़ा गुंतवणुकीमुळे शेअर बाजारात तेजी दिसली. परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे शेअर बाजारात शुक्रवारी 147.31 कोटी रुपयांची उलाढाल दिसली.

या आधीचे उच्चांक

  1 ऑगस्ट  37,711

  6 ऑगस्ट  37,714

  9 ऑगस्ट  38,076

या क्षेत्रात तेजी

धातू, रियल्टी, पायाभूत सेवा, तेल आणि गॅस, आरोग्य, ऑटो तसेच बँकिंग क्षेत्रात तेजी दिसली. तर एल ऍण्ड टी, ओएनजीसी, येस बँक, कोल इंडिया, टाटा मोटर्स, टाटा स्टील, विप्रो, वेदांता, एसबीआय, रिलायन्स, एचडीएफसी लिमिटेड, हीरो मोटो कॉर्प, एचडीएफसी बँकांच्या शेअर्समध्ये 4.17 टक्क्यांची वाढ दिसली. या क्षेत्रात गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे शेअर बाजार तेजीत होता.

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

इन्फोसीस, भारती एयरटेल, आयटीसी आणि टीसीएस या कंपन्यांचे शेअस 2 टक्क्यांनी घसरले.