घाडगे अँड सून मालिकेतील अक्षय-अमृता जाणार हनिमूनला

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या ‘घाडगे अँड सून’ या मालिकेत अक्षय आणि अमृताचे घटस्फोट मिळविण्याचे नाटक सुरू आहे. आमच्या नात्यात किती समस्या हे दाखवण्याचा जरी ते दोघे प्रयत्न करत असेल तरीही त्यांच्यातील हे भांडण मिटवण्यासाठी माईंनी मात्र अमृताला व अक्षयला एक गोड सरप्राईज दिले आहे. हे सरप्राईज म्हणजे हनिमूनचे पॅकेज. ‘घाडगे अँड सून’ मालिकेमधल्या माई त्या दोघांनाही हनिमूनला केरळला पाठवणार असून अक्षय व अमृतासमोर आता वेगळेच संकट उभे राहिले आहे.

त्या दोघांना हनिमूनला जायचे जरी नसले तरी ते माईंना हे बोलू शकत नाही. त्यामुळे सध्या ते द्विधा मनस्थिती अडकले आहेत. त्यातच अर्जुन हा कियाराशी नाते जोडण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यांमध्ये अमृता-अक्षय हनिमूनला जायचे कसे टाळणार? घटस्फोट मिळविण्यासाठी अक्षय अमृताचे जे प्रयत्न सुरु आहेत ते माईंना आणि घरच्यांना कळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

घाडगे सदन मध्ये अक्षय आणि अमृता हनिमूनला जाणार हे कळल्यापासून त्यांच्या शॉपिंगची तयारी सुरू झाली आहे. घरामधील सगळेच त्यांना चिडवत आहेत. कारण, लग्नानंतर दोघेही पहिल्यांदाच कुठे तरी बाहेर जाणार आहेत. आता अक्षय अमृता खरोखरच हनिमूनला जातील का? शिवाय या संकटामधून ते दोघे कसा मार्ग काढतील हे बघणे गमतीशीर असणार आहे. माईंच्या या हनिमून पॅकेजमुळे मालिकेमध्ये अक्षय-अमृताच्या नात्यात कोणते वळण येईल, हे पाहणे गमतीशीर ठरणार आहे.