सिरियल किलर मेहंदीचा भाऊ गजाआड

1

सामना प्रतिनिधी , संभाजीनगर

इम्रान मेहंदीच्या अपहरणाचा कट रचणारा आणि अपहरण करण्यासाठी आलेल्या टोळीला पैसा पुरविणारा मेहंदीचा चुलत भाऊ शेख रिजवान यास गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री गजाआड केले.

न्यायालयाच्या अवारातून सिरियल किलर इम्रान मेहंदीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ११ जणांना २७ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ते सध्या १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. टोळीतील दोघांनी इम्रान मेहंदीला पळून नेण्यासाठी परप्रांतीय शार्पशूटर विजयकुमार ऊर्पâ अफताब आणि अबू चाऊस या दोघांना बुधवारी रात्री अटक केली होती. ते सध्या पोलीस कोठडीत असून त्या दोघांची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता त्यांनी शहरात येण्याची आणि राहण्याची सर्व जबाबदारी इम्रान मेहंदीचा चुलत भाऊ शेख रिजवान शेख जहीर (३०, असेफिया कॉलनी) याच्याकडे होती, असे सांगितल्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने शेख रिजवान यास शुक्रवारी रात्री गजाआड केले असल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.