पोटदुखीतही रश्दी माझ्यावर जबरदस्ती करायचे; पद्मालक्ष्मीचा गौप्यस्फोट

सामना ऑनलाईन, लंडन

साहित्यकार सलमान रश्दी यांची सार्वजनिक जीवनातील चांगली बाजू सगळ्यांना माहिती आहे. मात्र त्यांची उजेडात न आलेली वाईट बाजू पहिल्यांदा समोर आली आहे. त्यांची चौथी पत्नी पद्मालक्ष्मी हिने आत्मचरित्र लिहलं असून ते लवकरच प्रकाशित केलं जाणार आहे. या आत्मचरित्रामध्ये तिने रश्दी यांच्याबाबत अशा गोष्टी लिहल्या आहेत ज्यामुळे त्यांचा अनेक जण तिरस्कार करण्याची शक्यता आहे.

रश्दी आणि पद्मालक्ष्मी यांची भेट १९९९ साली झाली होती. २००४ साली या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दिसायला अत्यंत सुंदर आणि जगातील हॉट मॉडेल्सपैकी एक असलेल्या पद्मालक्ष्मीने जेव्हा रश्दी यांच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा सगळेचजण अवाक झाले होते. या दोघांमध्ये २४ वर्षांचं अंतर होतं. लग्नानंतर सुरुवातीला सगळं चांगलं सुरू होतं. मात्र काही वर्षांनी हे चित्र बदललं आणि ते कसं बदललं ते पद्मालक्ष्मीने तिच्या आत्मचचरित्रात लिहिलं आहे.

पद्मालक्ष्मीला पोटाच्या गंभीर आजाराने ग्रासलं होतं. मला या विकारामुळे पोटात प्रचंड दुखत होतं, मात्र रश्दी त्याही परिस्थितीत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती करायचे असं पद्मालक्ष्मीने सांगितलंय. इथपासूनच आमच्या नात्यात दुरावा निर्माण व्हायला सुरूवात झाल्याचं तिने म्हटलंय. पद्मालक्ष्मीने म्हटलंय की तिच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर घरी परतल्यावर ती पलंगाला खिळून होती. यावेळी मला रश्दी यांच्या सहाऱ्याची गरज होती, ते काही दिवस तरी माझ्यासोबत थांबावे असं वाटत होतं मात्र दुसऱ्या दिवशी ते कामासाठी घरातून निघून गेले असं तिने म्हटलंय. हे बघितल्यानंतर मी रश्दींपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं पद्मालक्ष्मीने तिच्या पुस्तकात लिहलंय.