शिर्डी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण ; 5 महिलांसह सातजणांवर गुन्हे दाखल


सामना प्रतिनिधी, शिर्डी

शिर्डी नगरपंचायतीचे कर्मचाऱ्यांना मारहाण व मुख्याधिकारी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच महिलांसह सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा निषेध करत पालिका कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवारी पालिकेचे कामकाज बंद ठेवले.

शिर्डी शहरातील पालखी रस्त्यास जोडणाऱ्या भूसंपादन झालेल्या रस्त्याचे काम सुरू असताना काहींनी केलेले अतिक्रमण काढले जात असताना तेथील महिलांनी एका इसमाच्या चिथावनी वरून पालीकेचे मुख्य लिपीक देसले यांना लाथा बुक्क्यानी मारहान केली व मुख्याधिकारी यांनाही शिवीगाळ केली. या प्रकरणी देसले यांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीसांनी अनिल बर्डे, सविता बर्डे, अश्वीनी बर्डे, सरला बर्डे, अलका बर्डे, रूपाली बर्डे यांच्याविरूध्द सरकारी कामात अडथळा आनने शिवीगाळ करून मारहान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले.

या घटनेचा निषेध करन्यासाठी आज शिर्डी नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व अत्यावश्यक सेवेसह सर्व विभागांनी काम बंद आंदोलन केले. सर्वच कर्मचाऱ्यांनी यातील मुख्य फरार आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. यामुळे शिर्डीत नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशमन आदी सर्व महत्त्वाचे विभाग बंद होते. शिर्डी नगरपंचायत अधिकारी यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी दिवसभर कामकाज बंद ठेवून निषेध केला.