श्रीलंका स्फोट प्रकरणी सात संशयित अटक, संरक्षण मंत्र्यांची माहिती

4

सामना ऑनलाईन । कोलंबो

श्रीलंकेतील साखळी स्फोटप्रकरणी आतापर्यंत सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेचे सरंक्षण मंत्री रुवन विजेवर्धने यांनी ही माहिती दिली आहे.

इस्टर डेच्या दिवशी श्रीलंका साखळी स्फोटांनी हादरला. श्रीलंकेत लागोपाठ एकूण 8 साखळी स्फोट झाले यात  160 लोकांचा मृत्यू झाला असून 30 जण हे विदेशी नागरिक होते. या स्फोटांप्रकरणी आतापर्यंत सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या स्फोटातील बहुतांशा स्फोट हे आत्मघातही हल्ले होते असेही संरक्षण मंत्री म्हणाले.