7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानमध्ये 7 दहशतवादी पंजाबमार्गे घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे पंजाब आणि दिल्लीमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेत. हे संशयित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असून ते रस्तेमार्गाने दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिमी मिळत आहे.

बुधवारी पंजाबच्या पठाणकोटमधील माधोपूर येथे चार संशयितांनी एक कार पळवून नेल्याची घटना घडली असून, त्याचा संबंध दहशतवाद्यांशी आहे का याचा तपास पंजाब पोलीस करत आहेत. या दहशतवाद्यांचा दिल्ली व पंजाबमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा उद्देश असावा अशी शक्याता वर्तवण्यात येत आहे.