कुठे गेला गोवंश हत्याबंदी कायदा? भिवंडीत साडेसात टन गोमांस पकडले

2
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । भिवंडी

कर्नाटकातून मुंबई शहर व परिसरात विक्रीसाठी नेण्यात येत असलेले साडेसात टन गोमांस पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा पकडले. याप्रकरणी टेम्पोचालक मोहम्मद अन्सारी याला अटक केली असून १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही हा कायदा नेमका कुठे गेला, असा सवाल विचारला जात आहे.

कर्नाटकातून जनावरांची कत्तल करून एका टेम्पोमधून गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती पडघा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अर्जुनली टोलनाका येथे पोलिसांनी फिल्डिंग लावली आणि टाटा कंपनीचा संशयास्पद टेम्पो पकडला. या टेम्पोची तपासणी केली असता आतमध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस आढळून आले. भिवंडी, कल्याण, मुंब्रा, ठाणे व मुंबई या भागात हे गोमांस विक्रीसाठी पाठविले जाणार होते. दरम्यान अटक केलेला टेम्पोचालक मोहम्मद अन्सारी याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.