‘या’ 7 महिलांचे 7 विश्वविक्रम तुम्हाला आश्चर्यचकित करतील, वाचा सविस्तर…

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आजच्या युगात महिलांनी कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा आपण कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करताना दिसत आहेत. आज आपण अशाच काही महिलांबाबात जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या कामाने आणि वेगळेपणाने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.

अॅनेथा फ्लोरजाईक (Aneta Florczyk) –

aneta-florczyk
पोलंडची स्टार अॅथलिट अनिता प्लोरजाईक हिला जगातील सर्वात ताकदवर महिलेचा बहुमान मिळालेला आहे. ती एकाचवेळी 500 किलोग्रामपर्यंत वजन उचलू शकते. तिने 2 मिनिटात 12 पुरुषांना उचलून आदळले होते आणि याच कारनाम्यासाठी तिची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलेले आहे.

ज्यूलिया गुंथेल जलाटा (Julia Gunthel/Zlata) –

julia-gunthel-zlata
ज्यूलिया गुंथेल जलाटा ही जगातील सर्वात लवचिक महिला आहे.ज्यूलियाने फक्त 12 सेकंदात मान झुकवून तीन फुगे फोडले होते आणि यामुळे तिचे नाव गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रॅकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. ज्यूलियाची उंची 5 फूट 7 इंच आहे. पण लवचिक शरीरामुळे ती एका 50 मीटरच्या बॉक्समध्ये देखील स्वत:ला बसवू शकते.

जूलिया ग्न्यूज (Julia Gnuse) –

julia-gnuse
जूलिया ग्न्यूज या महिलेने आपल्या संपूर्ण शरीरभर टॅटू काढले आहेत. तिच्या शरीराचा 95 टक्के भाग टॅटूने भरलेला आहे. याच मुळे तिचे नाव गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रॅकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. ग्न्यूज 30 वर्षाची असताना तिला एक आजार झाला होता आणि तिच्या त्वचेवर डाग उमटू लागले होते. हे डाग झाकण्यासाठी ग्न्यूजने संपूर्ण शरीरावर टॅटू काढण्यास सुरुवात केली.

केटी जंग (Cathie Jung) –

cathie-jung
केटी जंग ही जगातील सर्वात लहान कंबर असणारी महिला आहे. ती अमेरिकेची रहिवासी आहे. याच कारणामुळे तिचे नाव गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रॅकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. जंग ही 5 फूट 8 उंच असून तिच्या कंबरेची साईज फक्त 15 इंच आहे.

आयरीन सीव्हो (Irene Sewell) –

irene-sewell
आयरीन सीव्हो ही हाय हिल्स घालून मॅरेथॉनमध्ये धावली होती. हाल हिल्स घालून तिने 43 किलोमीटरचे अंतर 7 सात 20 मिनिटात पूर्ण केले होते. याच कारणाने तिने नाव गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रॅकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.

ज्योहाना क्वॉस (Johanna Quaas) –

johanna-quaas
ज्योहाना क्वॉस या जगातील सर्वात वयोवृद्ध जिम्नॅस्ट आहे. सध्या त्यांचे वय 93 वर्ष आहे. ज्योहाना क्वॉस या जेव्हा 91 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी बर्लिन येथे आयोजित एका स्पर्धेत लोखंडी रॉडवर जिम्नॅस्टचे प्रकार करून दाखवले होते आणि सर्वांनाच हैरान केले होते.

ज्योती आमगे (Jyoti Amge) –

jyoti-amge
ज्योती आमगे या हिंदुस्थानी महिलेला जगातील सर्वात कमी उंचीची महिलेचा मान मिळाला आहे. तिचे नाव गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रॅकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. तिचा जन्म नागपूरमध्ये 1993 मध्ये झाला. तिची उंची फक्त 24.7 इंच म्हणजे 2 फूट 6 इंच (61.95 सेंटीमीटर) आहे.